STORYMIRROR

घनशाम सावरकर

Others

4  

घनशाम सावरकर

Others

स्त्रियांची सुरक्षितता

स्त्रियांची सुरक्षितता

1 min
505

का रे सैताना नारीच्या जीवावर उठलास।

तुही एका नारीच्या पोटी जन्मलास।

असेल रे ही पण कोणाची तरी संतान।

तू माणूस आहेस की सैतान? ...१...


इतकी भयंकर सजा दिलीस तिला।

काळीमा फासलास माणुसकीला।

कधी येईल रे याचे तुज भान।

तू माणूस आहेस की सैतान? ...२...


तुझ्यातले प्रेम नाहीच पण क्रौर्य दिसले।

भारतमातेलाही रडू कोसळले।रक्तबंबाळ केले मैदान।

तू माणूस आहेस की सैतान? ...३...


क्रूर, निर्दयी झालास तू माणसा।

बाहेर पडता स्त्री, टाकशील फासा।

कधी भागेल रे तुझी तहान।

तू माणूस आहेस की सैतान? ...४...


तुझ्या त्याच हाताला बहिण बांधते राखी।

त्याच स्त्री जातीची राख केली

इतकी आहे का ती अपराधी।

जिजाऊ, सावित्री जगात महान।

अन, तू माणूस आहेस की सैतान? ...५...


समाजात वासनांध लांडगे लपले आहे।

निष्पापीस जिवंत जाळून, माणुसकीला कलंक आहे।

माणूस तोंडी विविध वानं।

अन तू माणूस आहेस की सैतान? ...६...


Rate this content
Log in