STORYMIRROR

घनशाम सावरकर

Romance

3  

घनशाम सावरकर

Romance

साथ तुझी

साथ तुझी

1 min
515

साथ तुझी सखे आजन्म राहू दे।

तुझ्या प्रितीने मला लागले पिसे।।धृ।।


प्रीत माझी पण असे तुझ्या साथीला।

होऊनी तू वर्षा गंध येऊ दे मातीला।

एक होऊ दे मन, प्रेमाने न्हाऊ दे।।१।।


साथ तुझी सखे आजन्म राहू दे।

तुझ्या प्रितीने मला लागले पिसे।।धृ।।


जरी तू सखे सोडूनि मजला गेली।

कोमेजून जातील माझ्या मनाच्या वेली।

प्रीत तुझी नि माझी एक होऊ दे।।२।।


साथ तुझी सखे आजन्म राहू दे।

तुझ्या प्रितीने मला लागले पिसे।।धृ।।


राहील तुझाच प्रिये सदा।

साद दे माझ्या हाकेला।

एक होऊ दे हाक तुझी नि माझी।

प्रेमरूपी ऊरू दे ।।३।।


साथ तुझी सखे आजन्म राहू दे।

तुझ्या प्रितीने मला लागले पिसे।।धृ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance