STORYMIRROR

Shobha Wagle

Romance

3  

Shobha Wagle

Romance

मन तुझ्यात गुंतले

मन तुझ्यात गुंतले

1 min
539

काय जादू झाली?

काही न कळले!

एक मात्र नक्की

मन तुझ्यात गुंतले.

 

नजरा नजर होताच,

काळजात शिरली.

भान मी हरपून गेलो

तरी नजरेत तुला भरली.


झोप माझी उडाली

विचार तुझाच करताना

मन मोहुन जाई माझे

स्वपनात तू येताना.


मी जवळ तुज करताच,

गालावरती लाली चढली

मज मात्र सांगून गेली ती,

तू ही माझ्या प्रेमात पडली.


तुझी माझी प्रीत फुलेल

बांधेन मंगळसुत्र गळ्यात

करीन माझी सहचारिणी

लग्न कार्याच्या सोहळ्यात.


बाहू खोळंबले माझे 

तुझ मिठीत घेण्यास

मन तुझ्यात गुंतले हे,

वर्षाव चुंबनाचा करण्यास.

 

यावे तू मज जवळी

मज समजून घ्यावे

मन तुझ्यात गुंतले 

हे मम डोळ्यांत पहावे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance