मला पाहिल्यावर
मला पाहिल्यावर
रोज माझ्या मनातलं
त्या गुलाबाला सांगत असतो
त्या गुलाबाला कवेत घेताना
तुला पाहत असतो
गुलाब तुझ्या स्पर्शाने
फुलल्यावर
जणू माझ्या मनातले तुला कळत असते
मी नजरेआड होईपर्यंत
तू पुन्हा पुन्हा मागे वळून बघते
मी पाहत असतो तुला
मला पाहून आडोसा घेताना
मी पाहत असतो तुला
तुझे हलके फुलके स्माईल देताना
मला पाहिल्यावर
तू लाजत असतेस
केसांची बट मागे घेताना
अलगदपणे डोळ्यात बंद करून घेतेस
मी पाहत असतो तुला तुझ्या कवेतला गुलाब
माझ्यासाठी सोडून जाताना
जाता जाता पुन्हा भेटण्याचे सांगताना

