STORYMIRROR

Atul Shirude

Inspirational Children

3  

Atul Shirude

Inspirational Children

मला दिसतयं....

मला दिसतयं....

1 min
143

मला दिसतयं

मला स्पष्ट दिसतयं

योग्य ती काळजी घेत

जग कोरोनामुक्त झालयं

सगळं विश्व आनंदाने

मोकळा श्वास घेतयं


मला दिसतयं

मला स्पष्ट दिसतयं

कोरोनानामक महामारीमुळे

माणसाला माणसाची किंमत समजलीयं

सर्वांना एकमेकांशी प्रेमाने वागणं

अाता नक्की उमगलयं


मला दिसतयं

मला स्पष्ट दिसतयं

जीवन क्षणभंगुर आहे

हे सगळ्यांना समजलयं

सारं जग आनंदी राहून

आनंदात जगायला लागलयं


मला दिसतयं

मला स्पष्ट दिसतयं

सगळ्यांच्या जीवनात

आनंदाचं भरतं आलयं

अप्रिय असे दु:ख 

प्रिय सुखापुढे हरलयं


मला दिसतयं

मला स्पष्ट दिसतयं

सारीचं आता जीवनाचा

परिपूर्ण आनंद घेताहेत

भुत-भविष्याची चिंता न करता

वर्तमानात समाधानाने जगताहेत


मला दिसतयं

मला स्पष्ट दिसतयं

अवघ्या मानवजातीला

निसर्गाचं मोल कळलयं

सारीचं तनाने-मनाने

निसर्गास जोपासतायं


मला दिसतयं

मला स्पष्ट दिसतयं

निसर्गाचं शोषण होणार नाही

याची सगळे दक्षता घेताहेत

त्यासाठी स्वतःच्या सुख-सुविधांनाही

सगळी चक्क मुठमाती देताहेत


मला दिसतयं

मला स्पष्ट दिसतयं

छोटी-मोठी सारीचं

स्वतःबरोबर प्राणीमात्रांचीही काळजी घेताहेत

त्यांना हवं,नको सारं काही

अगदी काळजीपूर्वक बघताहेत


मला दिसतयं

मला स्पष्ट दिसतयं

ही पवित्र धरा

हिरवळीने संपूर्ण नटली आहे

आणि येथील सर्वांना

आपण स्वर्गात असल्याचा भास होतो आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational