STORYMIRROR

MOHIT DHOLE

Romance

3  

MOHIT DHOLE

Romance

मीनाक्षी

मीनाक्षी

1 min
447

गुणगुणतोय तुला आज

गुणगुणतोय तुला आज


कधी तू रात चांदनि ,

कधी तू स्वप्न साजणी

कधी तू बरसलेल्या धारा

कधी तू भिजलेला वारा


गुणगुणतोय तुला आज

गुणगुणतोय तुला आज


कधी तू लाजलेली राधा

कधी तू सजलेली मीरा

कधी तू नख शिखांत उमा

कधी तू सुमधुर विना


गुणगुणतोय तुला आज

गुणगुणतोय तुला आज


कधी तू नवीन पालवी

कधी तू तृष्णा सावली

कधी तू सुगरण साजेशी

कधी तू शुभ मीनाक्षी


गुणगुणतोय तुला आज

गुणगुणतोय तुला आज


कधी तू सांज गारवा

कधी तू गीत बरवा

कधी तू सुंदर राणी

कधी तू रूप रागिणी


गुणगुणतोय तुला आज

गुणगुणतोय तुला आज


मन होते वेडे माझे

अनामिक झाले माझे

तू आली गंध नवा आला

बहर प्रीती ला मिळाला ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance