Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MOHIT DHOLE

Others

3  

MOHIT DHOLE

Others

ऑनलाईन बीनलाईन

ऑनलाईन बीनलाईन

1 min
11.6K


आज सगळ काही ऑनलाईन झाल आहे

खरच नात्यातला स्नेह कुठे उरला आहे

घरा घरातील संवाद सरला आहे

प्रेमळ माये चा आधार कुठे उरला आहे !


आज सगळ काही ऑनलाईन झाल आहे

मोबाईल वेळेपेक्षा जास्त किमती झाला आहे 

छंद हा श्वास घेण्या पलीकडचा झाला आहे

जसे याने काही विश्व सामावून घेतले आहे !


आज सगळ काही ऑनलाईन झाल आहे

सौ. ची भाजी आज ऑनलाईन झाली

कन्येचा होमे वर्क सुद्धा पूर्ण

बाबा ची जुनी गाणी सुद्धा उपलब्द

ताई चा प्लाझो असतो ऑनलाईन च .!


आज सगळ काही ऑनलाईन झाल आहे

आईचे महालक्ष्मी दर्शन ऑनलाईन 

दादा चा श्री शरद पवार ची मुलाखत

किवा माझी कविता लिखाण सुद्धा ऑनलाईन !


आज सगळ काही ऑनलाईन झाल आहे

पहिल्या पावसात ली सेल्फी

पहिल्या प्रेमाची पहिली भेट

क्षणा क्षणाचे आनंदी हितगुज !

साधले सर्व काही ऑनलाईन मुळेच !


आज सगळ काही ऑनलाईन झाल आहे

जुन्या आठवणी पुन्हा सजल्या

मित्रांना आठवून गप्पा पुन्हा रंगल्या

छोटे मोठे झाले, रंग रूप बदलून गेले

आज ऑनलाईन मुळे नवे नाते जुळून आले !


आज सगळ काही ऑनलाईन झाल आहे

सहज झाले समाधान मिळाले

पण थोडे बोलणे कमी झाले

मन एकांतात गुंतून गेले

ऑनलाईन बीनलाईनमुळे युग बदलून गेले !


Rate this content
Log in