STORYMIRROR

MOHIT DHOLE

Others

3  

MOHIT DHOLE

Others

आठवणीतील दिवस

आठवणीतील दिवस

1 min
11.9K

आठवण येते मला माझ्या दिवसाची

जीवापाड जपणाऱ्या मित्रांची

धमाल मजा करण्याची

सोबत सोबत खेळण्याची

चित्रातील फुलपाखरे रंगविण्याची!


आठवण येते मला माझ्या दिवसाची

मराठी होती सोपी फार

इंग्लिशमध्ये शब्दाचा भडीमार

गणिताचे सर आम्हाला आदरणीय फार

भूगोलमध्ये आम्ही सर्वच पास


आठवण येते मला माझ्या दिवसाची

मामाचं पत्र हरवायचं

पतंगासोबत उंच उडायचं

पहिल्या पावसात चिंब भिजायचं

नाव कागदाची बनवायचं!


आठवण येते मला माझ्या दिवसाची

संत्र्याची गोळी खूप गोड लागायची

आईस गोळा खूप वेळ पुरायचा

भवरा तर नवलाईचा होता

कॉमिक्ससाठी मेळ आमचा जमायचा!


आठवण येते मला माझ्या दिवसाची

पुन्हा लहानपण येणार नाही परत

पुन्हा ते सोबती येणार नाही परत

पुन्हा ते दिवस येणार नाही परत

गेले ते दिवस राहिल्या आठवणी!

गेले ते दिवस राहिल्या आठवणी!


Rate this content
Log in