STORYMIRROR

MOHIT DHOLE

Others

3  

MOHIT DHOLE

Others

आज देवानी सुट्टी घेतली आहे !

आज देवानी सुट्टी घेतली आहे !

1 min
456

साधना करू कुठे मी

सांगड घालू कुठे मी

नाम स्मरण करू कुठे मी

पुष्पाजली अर्पण करू कुठे मी

आज सर्व काही शांत आहे

कारण आज देवानी सुट्टी घेतली आहे !


शाळा , मंदिर बंद झाले आहे

रस्ते निर्मनुष्य झाले आहे

श्वास सुद्धा बंधिस्त झाला आहे

कोंडून घेतले मनानी मनाला

आज सर्व काही शांत आहे

कारण आज देवानी सुट्टी घेतली आहे !


कळ्यांनी फुलांची साथ सोडली

वृक्ष वेलींनी बहर येण्याची

प्राणी मित्र मुके झाले

दीन हीन हरवून गेले

आज सर्व काही शांत आहे

कारण आज देवानी सुट्टी घेतली आहे !


आशा अपेक्षा चे ओझे वाढले होते

नाते व्यव्हरिक झाले होते

स्वार्थ , अहंकार वाढला होता

मानव स्वतच हरविला होता

आज सर्व काही शांत आहे

कारण आज देवानी सुट्टी घेतली आहे !


चंद्रा ने विचारले सूर्याला

तुझी भेट झाली का चैतन्याला

नीर उत्तर झाले सूर्य

मौन धारण घेतले आहे !

आज सर्व काही शांत आहे

कारण आज देवानी सुट्टी घेतली आहे !


प्राथनेला बळ येऊ दे

पूर्वी सारखे सुरळीत होऊ दे

फुल पाखराना बहरू दे

आता सुट्टीला पूर्णविराम दे

या दिनाला तुझे स्वरूप दिसू दे !


साहित्याला गुण द्या
लॉग इन