STORYMIRROR

MOHIT DHOLE

Romance

3  

MOHIT DHOLE

Romance

ती सध्या काय करते!

ती सध्या काय करते!

1 min
11.5K

कथा एका परीची

निरागस मैत्रीची

हसणे होते सुंदर

दिसण्यातही सुंदर!


मदत करायला नेहमी तयार

सोबतीला तिचा असे आधार

रुसण्यासाठी राग भरायचे

आणि लगेच शब्द गोड व्हायचे!


माझा अभ्यास ती करायची

तिचा टाईमपास मी

रोज रोज मेनू माझ्यासाठीचा

ती करायची आवडीचा !


ती मेरीट आणि मी फक्त पास

तरी मेजवानी होई आमची खास

गाऊ या, नाचू या, मजा करू या

आजचे क्षण आनंदने जगू या !


तिला आवडला मलेशिया

आणि मला माझा इंडिया

ते संवाद संपून गेले

क्षण सारे विरून गेले !


बरेच काही बोलायचे राहून गेले

तुझ्याकडे तुला मागणे राहून गेले

वजाबाकी शिकवून गेली

आयुष्यातील गुणोत्तर राहून गेले !


मनातील प्रश्न मनाला विचारावे

ती सध्या काय करते

नव्याने तिला का आठवावे

ती सध्या काय करते ! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance