Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MOHIT DHOLE

Others

3  

MOHIT DHOLE

Others

शब्दवेल

शब्दवेल

1 min
11.7K


सजले शब्द आज वेलीवर

एक नाही दोन नाही

असंख्य शब्दानि ती वेल फुलली

जुन्या नवीन शब्दाची उजळणी झाली !


शब्दफुल केतकी नि सजतात सारे

मोहक मन होतात तुझे माझे

ओवाळू उमा - उमा पतीला

आदिशक्ती गौरी च्या शक्ती स्वरूपाला !


सप्तसूर गीत संगीता मधले

रागिणी अनुरागीनी येतात सोबतीला

मधुर मंजुळ गीत रचतात

रमतात साजस शब्दाच्या वेली !


तारका सजल्या एका वेलीवरती

सुंदर शशी कला करती

शीत रजनी ती वेड लावती

सुधा रस तृप्त करती !


भारती ओहटी सागराची

निळेशार शुभ शीतल वाटे

लाट नाही सामजस्य लहर

वेल शंक शिंपल्याची अति सुंदर !


गुंफताना शब्दवेल प्रीतीची

राम , रमा , रती नावे स्नेहाची

पल्लवित झाले सुरेख सुमन

जुळले रेशीमबंध मनाला मनाचे !


पावसाच्या सरी आवडतात वेलीला

मोती सजवतात तिच्या स्वरूपाला

वर्षा , शरद भिजवितात

शिशिर , हेमंत मध्ये बहरतात !


शब्द सुमनानि , सुगंधनि

सुंदर सुंदर रंगानी आणि

भाव मधुर रचनाची ,

स्वीकारावे शब्द वेल हि प्रेमाने प्रेमाची !


Rate this content
Log in