♻ *मी श्रमिक बोलतोय* ♻
♻ *मी श्रमिक बोलतोय* ♻
मी बांधकाम कामगार
उभा नव्या छतावर,
हे विश्वच उभे आहे
माझ्या मजबूत हातावर
अल्प असूनी रोजगार
भागावे लागते मला,
झालो जरी जखमी
इतरांना जमणार नाही कला
कष्टाशिवाय जगात या
काहीच मिळत नाही,
आळस झटकल्याशिवाय
विश्वच कळत नाही
सावकाराचा विळखा
आम्हाला सुटला नाही,
गिळले त्याने शेत
पण गाव तुटला नाही
गरजेमुळे मला
व्हावे लागले कामगार,
शिकलो असतो तर
सावलीत असता रोजगार
श्रम केल्याशिवाय मित्रांनो
नाही कुठे स्थान,
श्रमच मिळवुनी देतात
जीवनात खरा मान
