शिवरायांचे पराक्रम
शिवरायांचे पराक्रम
माझ्या शिवबाची तलवार
कापे दुश्मन थरथर
माझ्या शिवबाची ढाल
करी गनिमांचे हाल
माझ्या शिवबाचा घोडा
म्हणतो विजयाचा पाढा
माझ्या शिवबाचा टोप
उडवी दुश्मनांची झोप
माझ्या शिवबाची किर्ती
होते अचंबित धरती
माझ्या शिवबाच धोरण
बांधा सिंचना धरण
माझ्या शिवबाची निती
नाही कशाचीच भिती
माझ्या शिवबाची छाती
आख्या मुलुखात ख्याती
माझ्या शिवबाचा पराक्रम
बसे खानाच्या उरात दम
माझ्या शिवबाचा कावा
जणू उभा शिकारी छावा
