STORYMIRROR

Avi bhaiyya

Inspirational

4  

Avi bhaiyya

Inspirational

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

1 min
24K

माझ्या शिवबाची तलवार

कापे दुश्मन थरथर

माझ्या शिवबाची ढाल

करी गनिमांचे हाल


माझ्या शिवबाचा घोडा

म्हणतो विजयाचा पाढा

माझ्या शिवबाचा टोप

उडवी दुश्मनांची झोप


माझ्या शिवबाची किर्ती

होते अचंबित धरती

माझ्या शिवबाचं धोरण

बांधा सिंचना धरण


माझ्या शिवबाची नीति

नाही कशाचीच भीती

माझ्या शिवबाची छाती

आख्ख्या मुलुखात ख्याती


माझ्या शिवबाचा पराक्रम

बसे खानाच्या उरात दम

माझ्या शिवबाचा कावा

जणू उभा शिकारी छावा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational