मी राहिलो
मी राहिलो
मी बोलवत राहिलो मी खुनवत राहिलो
नेहमीच मी तुला ये म्हणत राहिलो
जळत होते मन माझे विरहाने
प्रेमाच्या तुझ्या मिणमिणत राहिलो
पावसात भिजल्या खोट्याच्या नोटा
झेलून सरी अंगी मी खणखणत राहिलो
वणवा पेटला जळल्या त्या भावना
मी हसत हसत पुन्हा रणरणत राहिलो
माझा सखा कुठे गवसेल नेमका
क्षितिजापार मी वणवणत राहिलो
ऐकणारे तेथे कान होते हजार
मी मनात गीत गुणगुणत राहिलो

