Laxmidevi Reddy

Romance


4.5  

Laxmidevi Reddy

Romance


मैत्री

मैत्री

1 min 201 1 min 201

तुझं माझं नातं काहीसं असं आहे...

सुगंधाचं फुलाशी जसं आहे...


कधी नी कशी गुंतत गेले कळलेच नाही..

आधी कोणासोबत कधी असे बंध जुळलेच नाही..


खोलवर रुतुन बसलेय भावनांच्या डोहात..

जरा अतीचं गुंतुन गेलेय का मी तुझ्या मोहात..??


नवीन वीण विणताना भीती वाटतेयं, मैत्रीचा जुना धागा तुटेल का..??

तुझ्या विश्वातुन मी ओझरती झाल्यावर माझ्या मैत्रीची आठवण मिटेल का..


आजवरचे सर्व क्षण तु मनाच्या दालनात साठवशील का..

खुप त्रास दिलाय तुला पण तरीही ...


एखाद्या निवांत क्षणी वेडी म्हणुन मला आठवशील का..

आठवशील ना...आठवुन मग..


अलगद पापण्या मिटशील ना...

पापण्या मिटुन मंद हास्यात तुझी माझी मैत्री साठवशील ना.......?


Rate this content
Log in

More marathi poem from Laxmidevi Reddy

Similar marathi poem from Romance