मैत्री की प्रेम ?
मैत्री की प्रेम ?
सुंदर माझा मित्र तो
मैत्रीत त्याच्या रमली होती,
ना कळूनी अर्थ मैत्रीचा
आनंद मी घेत होती...
वाटायचे असे नेहमी मला
सुंदर बागेत मी बसली होती,
फुलपाखरा प्रमाणेच त्या बागेत
त्याच्या आठवणींसोबत मी खेळत होती...
खेळता खेळता मधेच कुठेतरी
विचारात त्याच्या भटकत होती,
कळत नव्हते मला हे
कि प्रेमात मी त्याच्या पडत होती...
सांगू कसे? म्हणू कसे?
स्वतःच स्वतःला घाबरत होती,
पवित्र मैत्रीला कुठेतरी,
डाग प्रेमाचा मी लावीत होती...
प्रेमाच्या ह्या विचारांमुळे
मैत्री कुठेतरी विसरत होती,
चुंबकापेक्षाही घट्ट असलेला
विश्वास मी तोडीत होती...
मैत्रीत करुनी विचार प्रेमाचा
आनंद मैत्रीचा मी घालवीत होती,
मैत्रीला दूर केलेल्या प्रेमात
फक्त दुखःच मी सहन करीत होती...
करुनी त्याच्या वर प्रेम
मी मैत्रीला डाग लावणार होती,
पण करुनी ‘ मैत्रीवर ’ प्रेम
मी माझी फक्त ‘ मैत्री ‘ सांभाळीत होती...

