तू दिलेलं फूल
तू दिलेलं फूल
प्रेमात तुझ्या पाडणारी, ती एक तुझी ओवी होती
मलाच माझ्यापासून हरवणारी, ती एक तुझी जादू होती
तू ऐकवलेल्या त्या कवितेत, आजही मी धुंद आहे
तू दिलेल्या त्या फुलाला, अजूनही मात्र तोच नवा गंध आहे
त्या नवीन आयुष्याची, ती एक नवी वाट होती
त्यात मला फक्त आणि फक्त तुझी साथ होती
सजलेल्या त्या सुंदर बागेत, एक फुलराणी बसली होती
चहूकडे ती आपली, मोहक पसरवत होती
त्या मार्गावरील तोच वारा, आज जरा संथ आहे
तू दिलेल्या त्या फुलाला, अजूनही मात्र तोच नवा गंध आहे
तू केलेल्या त्या प्रेमाची, कमी आजही तशीच भासणार
तू नसताना तुझ्या आठवणीतील, अश्रू कोण टिपणार
तू गेल्यावर मला कुणी, राजा म्हणणारं नसणार
हाक देशील तू मला, तेव्हा मी मात्र नसणार
तू केलेल्या त्या स्पर्शाची, जाण अजूनही तीच आहे
तू दिलेल्या त्या फुलाला, अजूनही मात्र तोच नवा गंध आहे

