Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Romance

4.6  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Romance

मैफल माझी

मैफल माझी

1 min
288


साज सुरांचे लाभावे,माझ्या सुखाच्या मैफलीला

अशीच सखे तू असावी,सदैव माझ्या सोबतीला|


झंकार भावनांचे उमटती, छेडीता तारा मनाच्या

शब्दही बहरून येती, पाहता सोहळा सुखाचा|


आलाप गंधाळल्या क्षणांचे, सुखविती नव यौवनाला

बहरती गीते प्रितीची ,सखे इथे क्षणा क्षणाला|


हिंदोळ्यावर स्वर साजाच्या,नयनांनी तुझ्या झुलावे

माझ्या मोरपिसी स्पर्शाने, सखे तू मोहरुन यावे|


कैफ चढलेल्या आरोहाला, अवरोहाने कवेत घ्यावे

भरले घडे सुखामृताचे, आज सखे तू चिंब व्हावे|


मैफलीची भैरवी ही,या दिव्य स्वरांनी सजावी

अशीच प्रीत माझी,सखे, तुझिया मनात रुजावी|


Rate this content
Log in