STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

माणसांच्या गर्दीत

माणसांच्या गर्दीत

1 min
245

मी माणसांच्या गर्दीत

स्वतःला शोधत असताना

कधी हरवलो कळलेच नाही

हरवल्यामुळे मला

माणस ओळखता यायला लागलीत


खरंच या दिडशहाण्या माणसांच्या गर्दीत

शहाण्याला ओळखणे 

कठीण असते

ज्यांना आपण आपले म्हणतो

तेच नकळत परके होतात


या माणसांच्या गर्दीत

माणुसकीची माणसे फार कमी असतात

माणूस मनावर घाव करून जखमा देतो

मन जुळवून घेणारी माणसे आता आहेत कुठे

खरंच मनावर ओरखडा करणारी माणसे

किती कठोर असतात नाही?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational