मालक
मालक
मालक....पैशाचं ....काय
तेव्हढ बघाना
पाऊस पडला नाही म्हणून शेत विकले
कर्जाच्या बोजवाऱ्यने
घरही सुटले
कर्ज फिटले नाही म्हणून
बाप जग सोडून गेला
मायच्या कपाळावरचा
कुंकू घेऊन गेला
बाप गेल्याच्या धक्क्याने
माय पण मरून गेली
बहिणीची जबाबदारी
मला सांगून गेली
जगायला आता साधन राहिल नाही
बापाच दुःख त्या देवानेही
पाहिलं नाही
घर गेले शेत गेले
राहिला नाही निवासा
पंचायतीच्या एका पडकी
खोलीचा घेतलाय सहारा
मालक
बहिणीच लग्न करायच आहे म्हणून पैसे मागतोय
गहाण ठेवायला काहीच नाही
फक्त एक पेन उरलाय
ज्या पेनने तुम्ही कर्जाचे
मोठे मोठे आकडे लिहतात
किती किती लोकांचा जीव मुठीत दाबून ठेवतात
त्या पेनच्या आधारे मी शिकणार होतो
शिकून मोठा साहेब होणार होतो
साहेब झालो असतो तर सर्व कर्ज फिटले असते
बहिणीचे लग्न थाटात केले असते
पण तसे झाले नाही
पावसाने थोडीफार जरी
दया दाखवली असती तर
बापाने मेहनत करून भरपूर पिकवले असते
बाप कर्जातून सुटला असता
सुखासमाधानाने जगला आसता
सुखाचे जगणे नियतीला
मंजूर नव्हते
सटवाईने वेगळेच टाक टाकले होते
आहो कर्जाचा प्रश्न सुटत नव्हता
अश्रूंचा पुर आटत नव्हता
माझ्य एकुलत्या एक बहिणीची चिंता बापाला खायची
पोरीच कस होणार म्हणून माय रडत रहायची
आता मायच स्वप्न मला पर्ण करायच आहे
दुध दुभत्या भरल्या घरात
बहिणीला लग्न करून पाठवायच आहे
ति तिच्या सासरी सुखात राहिली की
मी मोकळा होणार
मरेपर्यंत तुमच्या ईथे स्वतःला गहाण ठेवणार
तेव्हा....मालक....
पैशाच काय तेव्हढं बघाना...
