माझी मराठी
माझी मराठी
शब्द अर्थपूर्ण, वाक्य अर्थपूर्ण
माझ्या मराठीतील गद्य अर्थपूर्ण
शब्द रसाळ, ओळही रसाळ
माझ्या मराठीतील काव्यही रसाळ
कथा ही छान, कादंबरीसुद्धा छान
माझ्या मराठीतील गोष्टीही छान
वाक्प्रचार आणि म्हणी चपखल
माझ्या मराठीतील सुविचार चपखल
उपमा अवीट, अनुप्रास अवीट
माझ्या मराठीतील रसही अवीट
सरस भावगीत, अभंगही सरस
माझ्या मराठीतील ओव्याही सरस
ज्ञानेश्वरी, गाथा, भागवतही श्रेष्ठ
माझ्या मराठीतील सर्व ग्रंथ हे श्रेष्ठ
संत महान, पंतही महान
माझ्या मराठीतील लेखक, कवीही महान
प्रेरक पोवाडे, शाहीरही प्रेरक
माझ्या मराठीचा इतिहासही प्रेरक
बहारदार लावणी, संगीतही बहारदार
माझ्या मराठीतील फटकेही बहारदार.
माझी ही मराठी भाषा हो भरदार
करू या सारे आपण तिचाच नित्य जागर
