STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Classics Inspirational Children

3  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Classics Inspirational Children

माझी अडाणी आई...

माझी अडाणी आई...

1 min
330

माझी अडाणी गं आई

उणे जीवन कंठीते

संसाराचा गाडा एकी

निरंतर चालविते


स्वतः उपाशी राहुनी

लेकरांस घास देई

नाही अंतरी परीघ

तरी तिचा,भास होई


आता तरी परतून

फिर माघारी एकदा

चित्त माझे नसे जगी 

याद जीव घेई सदा


हरलोय या ब्रह्मांडी

काव्य तुझे गं रचीले

उभ्या हयाती माझिया

गुरू तुलाच वंदिले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics