माझे शहर
माझे शहर
स्वप्नामध्ये नवे पाहिले
लाल गुलाबी शहर मितवा
जागोजागी,गल्लो गल्ली
नव्या फुलांचा बहर मितवा
बेहोश करते मदहोश मनाला
तुझी.गारुडी नजर मितवा
जिंदगीत भिनले माझ्या
जहाल कैफाचे जहर मितवा
युगानुयुगे चालले
जरी द्वेषाचे समर मितवा
आज आहे उद्या राहिल
प्रेम माझे अमर मितवा
देवघेवीच्या जगात नाही
भावनांची कदर मितवा
उरात डसते जखम होवूनी
अवहेलनेची कसर मितवा
हळव्या भावनांचे शहर माझे
इथे प्रेमाचा गजर मितवा
मागितलेस जर समर्पणाला
पंचप्राण हे हजर मितवा
