बुद्ध
बुद्ध
1 min
175
का छळते वेदना दुःखाची
अंतर्यामी माणसा
क्षणात दिली सोडून तू
राजवैभवाची लालसा
पाखंड्यांच्या कर्मात नव्हता
धर्मही फारसा
करूणेच्या जोत्स्नेत तुझ्या
झाली धर्मपीठे खालसा
नवचैतन्य झालास तू
दुर्बलांचा दिलासा
निनादले सारनाथ ऐसे
ऐकूनी अभयाचा भरवसा
चालले भिख्खूंचे जत्थे
घालूनी हिमालयास वळसा
विरून गेला देशोदेशी
अंधरूढींचा वारसा
शरण आले भामटे
झाकून मिथ्य कवडसा
तथ्य घेऊन उगवलास तू
तेजोनिधी अढळसा !
