STORYMIRROR

Riya Sarpe

Others

3  

Riya Sarpe

Others

पाऊस

पाऊस

1 min
272

मेघ लपेटून घेती

डोंगराची वनराई

रानपाखरांचे थवे

झोके घेती शिवारी

खळखळते ओघाने

निर्झराचे शुभ्र पाणी

अल्याड पल्याड

हिरवी हिरवी झळाळी

रानवेलीच्या झुल्यावर

कुठे राघू शिळ घाली

थेंब थेंब झरतो

झाडीतल्या पानोपानी

होई मल्हार सैराट

चराचरात नवलाई

घोसाघोसाने झुलते

कमानीवर रानजाई

वर्षाऋतूचा सौरभ

दाटला आसमंती

मोर नाचतो थुईथुई

मानसीच्या आमराई !


Rate this content
Log in