माझे खूप हाल व्हायचे
माझे खूप हाल व्हायचे
तुला पाहतांना सखे
माझे डोळे भरून यायचे
खरंच सांगू अंतकरणातून
माझे खूप हाल व्हायचे
खूप दिवसांनी तू आलीस
जुनं चित्र रेखाटू लागलीस
काहीच कळलं नाही मला
चित्रा सारखंच का वागलीस
वावटळी ची सोबत घेऊन
तू ही एक वावटळ झालीस
उभ्या आयुष्याची राख करून
तू अशी कशी गं थट्टा केलीस
चांदण्याची बरसात होतांना
शेवटी येऊन मिठीत घेशील
अन आयुष्याची खडतर वाट
माझ्या सोबत तू चालशील
अशी सारी स्वप्ने रंगवतांना
तुला कवितेत सजवत होतो
तुटलेल्या काळजावर दगड ठेऊन
माझे शब्द सारे झिजवत होतो

