माझा श्वास
माझा श्वास
वाळवंटात दिसणारे मृगजळ तू
रात्रीत चमचमणारे काजवे तू
तूच सुगंध कस्तुरीचा आणि
त्या दूर क्षितिजाच्या आभास तू...
अकल्पित वळणांचा ध्यास तू
फसव्या नागमोडीचा भास तू
तूच आहे सागरकिनारा आणि
मरेपर्यंत जगवणारा श्वास तू...

