STORYMIRROR

Shivam Madrewar

Romance

3  

Shivam Madrewar

Romance

माझ चंद्रच हरपलंय.

माझ चंद्रच हरपलंय.

1 min
248

माझी प्रेयसी आज रुसली,

दुसऱ्याच जगात ती गेली,

आज काळोख पसरलंय,

आणि माझ चंद्रच हरपलंय.


खिडकी मागे ती लपली, 

डोकावून ती बघू लागली,

ठंड वारे सुट्टीवर गेलंय,

आणि माझे चंद्रच हरपलंय.


डोळ्यांमधुन गंगा वाहिली,

रात्रभर तीने ऊशी ओली केली,

समुद्राच्या भरतीच पाणी आलंय,

आणि माझ चंद्रच हरपलंय.


सर्व काही चित्रांमध्ये रेखाटली,

कवितेमध्ये दुःख ती मांडली,

शब्दांमध्यो तीचे प्रेम लपलंय,

आणि माझ चंद्रच हरपलंय.


मैत्रीणींसोबत ती व्यस्त झाली,

बालपणामध्ये ती हरवली,

आज फुलपाखरू बागेत हरवलंय,

आणि माझ चंद्रच हरपलंय.


ताऱ्यांसोबत आकाशात रमली,

जमिनीवरती सायंकाळी परतली,

तीला माझे प्रेमपत्र सापडलंय,

आणि माझ चंद्र आज परतलंय.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance