Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pradnya Ghodke

Classics

4.5  

Pradnya Ghodke

Classics

कविता क्रं.६. शीर्षक:-सहा ऋतूंचे देखणे सोहळे...!

कविता क्रं.६. शीर्षक:-सहा ऋतूंचे देखणे सोहळे...!

1 min
288

सहा ऋतूंचे देखणे सोहळे,

कसे डोहाळे बदलत्या ऋतूचे..?

फिरूनी वाटे श्रावण आले,

तरी..समर्पण त्या भादव्याचे...! १.

ऋतू जरी ऊन-पावसाचा,

शहाराही येतो वसंताचा..

गुलमोहोर फुलुनिया तो,

क्षणैक भास होतो वादळाचा...! २.

कधी कैफात बरळतो वारा,

बहरूनी गजबजते राई..

सुगंध पसरूनी अफवा मग,

गावातून पसरत जाई...! ३.

प्राजक्त फुलुनी आला,

अंगण सारे घमघमले..

बदल्ती ऋतूक्षणाक्षणाला,

तरी तन-मन वसंत झाले...! ४.

सहा ऋतूंचे सहा सोहळे,

सृष्टीदान हे समजून घ्यावे..

असे देखणे सोहळेही,

मनुजा तू लेवुनी घ्यावे...! ५.

सुख-दु:खांची संध्याछाया,

जणू पाठशिवणीचा खेळ श्रावणी..

सहा ऋतूंचा सांद्र जिव्हाळा,

हर्ष-खिन्नता जपे झेलुनी...! ६.

Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics