कवी
कवी
जसा रवी आगेचा पत्थर
कवी असतो हास्याचे शिखर।।
जना हसवतो, खेळवतो
असतो तो भावनांचा सागर।।
कधी सूर्य अंधारात उगवतो
पहाटे तारेच काय दाखवतो।। आभाळात चांदण्या लुकलूकतात
पाण्यात अग्नी काय पेटवतो।।
केव्हा बनतो तो पक्षी
प्राणीही बनतो कधी।।
जाणतो रुक्ष संवेदना
वाहतो बनून नदी।।
जगाच्या संवेदना झेलतो
सांन बनून खेळतो।।
नाचतो कधी मोर बनून
निसर्गाशीही बोलतो।।
दुसर्यासाठीच जगतो
करुणा तो शिकवतो।।
अविद्येला थांबवून
नवी भरारी देतो।।
अंधश्रद्धेचा करतो त्याग
लढतो, झगडतो दैवशी।।
माणुसकी शिकवतो वागण्याची
माणूस बनून माणसाशी।।
