STORYMIRROR

SWAPNIL SARDE

Others

4  

SWAPNIL SARDE

Others

माझी प्रेमिका

माझी प्रेमिका

1 min
300

न बघता ग मी तुला

मन उदास उदास वाटे।।

तुझ्या साठीच मी जगून

किती पार करावी काटे।।


दिसता रवी ग क्षितिजा

अग तुलाच मी आठवतो।।

अन तुझ्याच स्मरंनामध्ये

हा जीव माझा साठवतो।।


केस तुझे ग शीतल

मनी माझ्या खूप भावी।।

अन तुझ्याच नैनामधली

असृची तळे व्हावी।।


तुझ्या गालावरची लाली

जशी गुलाबाची पाकळी।।

तुला गाता मी कुठे

अग ऐकावी तू टाळी।।


तुझे पैंजण छम-छम वाजे

जसा वाटे नाच मोराचा।।

किती सुंदर तुझे ग नटने

जसा थाट हा निसर्गाचा।।


जीवनाच्या माझ्या वाटेवर

तुझी सावलीच मी चढतो।।

अग सखे कविते माझी

तुझं लिहूनच मी घडतो।।


Rate this content
Log in