STORYMIRROR

Pratibha Vibhute

Classics

3  

Pratibha Vibhute

Classics

कुलस्वामिनी

कुलस्वामिनी

1 min
463

आई तुळजा भवानी

कर जोडून नमन

 तुझ्या कृपेने फुलावे

माझे गोकुळ सदन...१!


तुळजापुरात माते

डोंगरावरती स्थान

सोनसळी पडती ती

मंदिरावरती छान...२!


शिवबांची तू आराध्य

माता हो कुलस्वामिनी

राक्षसाचा नाश करी

 महिषासूरमर्दिनी...३!


शिवबांना तलवार 

आशीर्वाद देई आई

भक्त रक्षिण्या सदैव

येई धावतच बाई...४!


नवरात्री नऊदिनी

करी करती जागर

फुंकनिया नारी साऱ्या

अष्टमीला ती घागर...५!


भक्त तुझे आई घाली

षठी दिवशी गोंधळ

उदो उदो आई बोला

वाजविती ते संबळ...!६


पोत पलिता हातात

पेटवून गाणे गाती

कवड्यांची माळ गळा

भक्त आनंदी राहाती...७!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics