कशी असावी कविता (,अष्टाक्षरी)
कशी असावी कविता (,अष्टाक्षरी)
अशी असावी कविता
मंत्रमुग्ध करणारी
भविष्याची प्रचारक
अनंतात भरणारी.....
कळवळा जपणारी
दया माया करूणाई
मार्गप्रस्त कविताही
सर्वांसाठी वरदाई.......
तेज वायू पाणी अग्नी
पंचतत्व अविष्कारी
निसर्गाला ओवाळुन
खरी कविता भूवरी......
नदी झरे तळे मळे
भरी कविता घागर
लाली क्रांतीची भरूनी
शब्द घडवी नगर......
शब्द तलवार जणू
चाले अती पणावरी
देती बोलका वार ती
देत असे ललकारी.....
