कशाला रोज ?
कशाला रोज ?
नक्षलवाद, माओवाद अमानुष कारवाया कशाला रोज
नाहक निर्दोषांचा जीव जातो, वाया कशाला रोज ?
मेंदू विकलेल्या,अविवेकी सैरावैरा पिसाट झुंडी
तथ्यहीन म्रुत्युचा जीवघेणा खेळ कशाला रोज ?
म्हणे, कडवी साम्यवादी लोकहितवादी चळवळ ही
मूळ उद्देशाविना भरकटत चालली कशाला रोज?
पोलिस, सी.आर.पी.एफ.जवानांचा काय दोष?
कर्तव्यावर, निष्पाप जीवाला मारता कशाला रोज?
सुरूंग स्फोट निशस्त्र जवानावर भेकाड हल्ले
गांडूप
्रवृत्ती स्वतःचाच उपमर्द करता कशाला रोज?
जनावराचे जिणे तुमचे जंगलात नुसती वणवण
खाण्यापिण्याचे वांदे, कुत्र्यासारखे मरता कशाला रोज?
षंड, नासक्या राजकारणाचे ठरलेले बळी तुम्ही
आपल्याच भावंडाचे प्राण घेत फिरता कशाला रोज
कुणी कुटुंबाचा आधार, कुणी म्हाताऱ्या श्वासांचा निर्धार
कुणी उमेद स्वप्नांची, ती बेचिराख करता कशाला रोज?
मारणारे तुम्हीच आणि मरणारेही तुम्हीच
पिढ्या गारद होत आहेत भावांनो, तुमच्या अशाच रोज..