STORYMIRROR

sunil kowe

Inspirational Others

4  

sunil kowe

Inspirational Others

स्वप्न उद्याचे

स्वप्न उद्याचे

1 min
138

साचलेलं दुःख अगदी आत बाहेर झिरपलं

डोळ्यात आसवे मुक्कामी मन गहिवरलं

दुःखाने गुदमरलेली संध्याकाळ पुन्हा समोर

पुन्हा सूर्योदयाची वाट मन उत्साहाने भरलेलं..


स्वप्न उद्याचे निष्प्राण डोळ्यात साठवून

तांडे चालली मावळतीच्या दिशेने

पाठीवर संसाराचे कष्टप्रद ओझे घेऊन

येतील उद्या सुगीचे दिवस या आशेने..


कमालीच्या हालअपेष्टा आभाळच फाटले

डोंगराएवढ्या समस्यांचे मेघ आकाशी दाटले

साडेसाती जीवनाची काही केल्या दूर होईना

मुद्दल सोडा दुःखाचे व्याजानेच कळस गाठले..


आयुष्य मृगजळ जीवन आहे उधारी

होतील स्वप्न पूर्ण राहिली जी अधुरी

खोलवर पुरावं माझ्या अविवेकी स्वप्नांना

त्यासाठी निश्चयाने पेटून उठावं आतातरी.


नुसता कोंडमारा होतो इच्छा आकांक्षाचा

स्वप्नांच्या मागे धापा टाकत धावणारे मन

धैर्य घुटमळत राहिले अपेक्षांच्या दारावर

लायकीचा उंभरटा ओलांडण्याचा प्रयत्न.


शिरस्ता दुर्मिळ,मोठी स्वप्न बघण्याचा

का बघू नयेत? तो हक्क आहे डोळ्यांचा

एरवी कफल्लक जिणे पाचवीलाच पुजली

उद्याची स्वप्नं घेऊन हाती अर्थ शोधतो जगण्याचा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational