STORYMIRROR

vaishali vartak

Romance Others

4  

vaishali vartak

Romance Others

कसे सांगू मनातले

कसे सांगू मनातले

1 min
509


खूप आहे सांगायचे

कशी करु सुरुवात

माझे मला उमजेना

करी विचार मनात


मन गुंतले विचारी

गुज असती अधरी

सांगू कसे तुला ते

शब्द आठवी अंतरी


मनी केलाय विचार 

लिहू शब्द सांगण्यास

 वही पेन घेऊन ही

मन स्तब्ध लिहीण्यास


सख्या ये तूच जवळी

शब्द होतील ते व्यक्त

तुझ्या भेटण्याने बघ

 मज मन होई रिक्त



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance