क्रांती
क्रांती
प्राणांची देऊन आहुती
घडवून आणिली क्रांती
धर्मभेद नको भांडण
नांदो सदैव शांती..
निर्मिला इतिहास ज्यांनी
वैऱ्या ला पाजीले पाणी
दुबळे नच इथे सर्व ज्ञानी
ओठी असो क्रांती ,गाणी
वैरभावना नको घडो
सुसंगती.....
हिंदू ,मुस्लीम,शिख,
इसाई
भारतभूमी सर्वांची आई
मत भिन्नता नको काही
नव विचारांची घडो नवलाई
नको कुठे अशांती....
देश असे हा वीरांचा
बुद्ध,कबीर अन्
महापुरुषांचा
मार्ग अवलंबू या आपण
तयांचा
आदर्श घेऊ थोर विचारांचा
तिरंग्याचा मान राखता
पसरेल दूर ख्याती..
