STORYMIRROR

Sanghmitra Sorate

Others

3  

Sanghmitra Sorate

Others

रंगला रंगात श्रीरंग...

रंगला रंगात श्रीरंग...

1 min
309

रंगला ग रंगी सावळा श्रीरंग

राधे सवे खेळे गोकुळात रंग

भिजता चतन भिजले ग मन

सप्तरंगात हरवली राधा

 देह भान

गोपीका ही झाल्या रंग

उधलण्यात दंग...


विसरून सारे क्षण

क्षणभरी

रंगाची उधळण मुक्त

करे श्रीहरी

भिजलो ती साडीचोली

झाली कशी तंग...


खोडकर कान्हा म्हणती

गोकुळी जण

आनंद सोहळा पाहे

देवगण

ऋषी मुनीच्याही होई

समाधीचा भंग...


पाहते यशोदा कवतूके

सोहळा

न्यहाळते दुरुन देवकीच्या बाळा

हवा हवासा वाटे त्याचा

सर्वांना संग...


प्रेमरंगे रंगली राधा

रंग ता रंगात

पुरे झाले केशवा विनवी

जोडूनिया हात

भाव भावना चे रंग

मनी उठवी तरंग...


चक्रधर म्हणे कुणी

म्हणे घनशाम

गण ग वळण गाता

घेती तुझे नाम

भक्ती चे रंगात होई

चिंब त्याचे अंग...


रंगला ग रंगी

सावळा श्रीरंग.


Rate this content
Log in