किमया
किमया
1 min
137
आले भरुनी आभाळ
आल्या पावसाच्या सरी
वारा वाहे सळसळ
जशी वाजते बासरी...
प्रफुलीत फुल वेली
धरा झाली धुंद, मृदा
गंधात नहाली
थेंब होऊन टपोर
मुक्त वर्षाव करी...
मुक्या बोलत्याची
काहीली होई क्षणातच बंद
हर्षे लुटूनिया घेती
चिमणी पाखरं स्वानंद
तुषार झेली पंखांवरी...
कोकिळा ही गाऊ लागे
सुस्वरे गोड गान
तृप्त होई चकोर
भागता च तहान
ढग होता गोळा
जल भरुनी अंबरी...
नाच नाचतो मयुर
फुलउनी पिसारा
नभाकड पाही
करून पुकारा
कडाडते वीज
धडधड होई अंतरी...
खळखळ वाहे नदी
नाद मधुर घुमतो
इंद्रधनू सप्तरंगी
प्रतिबिंब ते पहातो
सृष्टी सारी सजली
किमया पाऊस करी...
होण्या अंकुरित झाली
तृप्त अधीर धरणी
आंनदुनी बळीराजा
करी जोमाने पेरणी
हिरव्या स्वप्नपूर्ती ची
सदा मनी आस धरी...
आले भरून आभाळ
आल्या पावसाच्या सरी.
