STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Romance Others

4  

Nurjahan Shaikh

Romance Others

कोरोनातले प्रेम

कोरोनातले प्रेम

1 min
247

अबोल प्रित कळेना 

तुला माझ्या नयनात, 

बंधने ही ओठांवर 

तुझीच छबी मनात. 


संयम धर सख्या 

आपल्या मिलनास, 

संपू दे कोरोनाला 

कोणी न आडवे प्रेमास.


असेच बघत राहा 

डोळ्यात या माझ्या, 

पाझरु दे झरा 

अबोल प्रेमाचा तुझ्या. 


बंधनात सख्या आज 

अडकलोय आपण, 

प्रेमासाठी आज प्रिया 

करूया काही पण.


आपल्या प्रेमाची कथा 

सुरू झाली कोरोनात, 

संपू दे हि रोगराई 

कमी ना ठेवू काही प्रेमात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance