STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Abstract Inspirational

3  

Mrs. Mangla Borkar

Abstract Inspirational

कोरोना

कोरोना

1 min
251

माझा माझा करता शेवटी


आयुष्य संपुन जातो.


अहंकाराच्या उन्मादाने माणूस


पार वेडा होऊन जातो.


आज कोरोनाने दाखवून दिले...


काहीच शेड्युल बिझी नसतो.


आपणच शोधतो आपले काम


अख्ख आयुष्य निघून जातो...!


आयुष्याचा अर्थ असतो कसा


आज मला कळतोय...!


काहीच गरजा नसतात जीवनात...


विनाकारणच जीव पळतोय


शेवटी जवळचाच किरानावाला


लॉक डाऊन च्या वेळी कामी येतो...!


ब्रॅण्डेड ब्रॅण्डेड करता करता माणसा


कुठे ब्रॅण्डेड कामात येतो.


पैसा, पद, प्रतिष्ठा फक्त


जीवनी क्षणापूरते असते...


साधे जीवन जगावे परी


तेच चिरकाल टिकते...


निसर्गाच्या साम्राज्यापुढे


कधी कुणाचे चालत नाही...


मीच माझा कर्माचा संगाती


फळ नेहमी तेच मिळत राही.


कमीत कमी का होईना


कोरोना खूप काही शिकवून गेला...


असेच जीवन जगावे म्हणत.....


माणुसकीचा धडा शिकवून गेला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract