STORYMIRROR

Dev music

Inspirational

3  

Dev music

Inspirational

कोरोना

कोरोना

1 min
469

बंद झाले गाव माझे, बंद झाले शहर,

कोरोनाच्या महामरिने ,केला घरोघरी कहर...

पैसा कामी आला नाही, ना श्रीमंतांची श्रीमंती कामी आली,

एका एका बेड साठी, दवाखान्यातील उपचारासाठी माणसं हवालदिल झाली...

विसरले दुःख सारे, विसरले सुखाचे ते क्षण...

आपल्याच घरात कोंडून पडला , माणसातले करूणपण...

सण साजरा होत न्हवता, समारंभ सगळे थांबले होते,

भूत आणि भविष्याच्या मध्यावरती, सगळं विश्व निपचित होऊन पडले होते...

"एकटाच आलो तसा एकटाच जाणार", असं म्हणत माणसं स्मशानात जायला , चार हात दूर होते,

तर " गेलेला तो आपला नाहीच" अस म्हणून एकीकडे माणसातल माणूसपण पारखे होत होते....

डोळ्यांना दिसत नसलेल्या, पण तरीही आपलं अस्तित्व दाखविलेल्या या कोरोनाने , सगळं जग हादरले होते,

भांडण, हेवेदावे सगळे लयाला गेले होते...

 एकमेकांना शुभाशीर्वाद आणि माणसातली जगण्यासाठीची जिद्द वाढवत होता तो,

असा हा कोरोना, रोजच्या सुखदुःखाचा दावेदार होता तो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Dev music

Similar marathi poem from Inspirational