STORYMIRROR

Dev music

Action Classics Inspirational

3  

Dev music

Action Classics Inspirational

स्त्री

स्त्री

1 min
200

तिचे आई वडील काय करतात?

कष्ट करतात , अजूनही, या वयात..

तिचे शिक्षण ? ग्रॅज्युएशन आहे ना,

तिला काही इतर knowledge?

घरचे, बाहेरचे सर्व काही handle करू शकते ना, अजून काय हवं ???

ती काय तर म्हणे , गळ्यातले कानातले विकते ?

हो ,तो तिचा बिझनेस आहे...

ती नोकरीही करते, म्हणे!!!

हो, ती त्या ऑफिसमधील head आहे..

ती चॉकलेट, ज्वेलरी पण बनवत असते ?

हो, तो तिचा छंद आहे....

प्रदर्शनात स्वतः बनविलेल्या वस्तू ठेवते?

हे तर काय मी पण करू शकते.

हो, तू करत असशील. पण ती जिद्दीने करून दाखवते...

घरकामात पण थोडी कच्चीच आहे,

सर्व कामे केल्यानंतर ते कोणी पाहावं असं तिला वाटतच नाही मुळी.

भाज्याही शिजत नाही, हाताला तर चवच

 नाही,

भाज्या शिजल्या आणि त्या चविष्ट ही झाल्या, हे सांगण्यासाठी आवडीने खातच नाही कोणी.

नवरा तर सारखा तिच्या मागेपुढे करत असतो,

सगळे मागे सोडून , ती फक्त त्याच्या विश्वासावर तर आली आहे घरात.

ती कोणाची तरी सून आहे, भावजय आहे, जाऊ आहे,

हो ती सबला आहे, अबला नाही.

ती ही तुमच्या आमच्या सारखीच स्त्री आहे,

खेळण्यातली बाहुली नाही....


 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action