कोरोना योद्धा
कोरोना योद्धा

1 min

1.0K
समतोल बिघडला निसर्गाचा
मानवा कसा घातला रे घाव,
कोरोनाच्या या महामारीतून
देवा सुटकेचा आम्हा मार्ग दाव,
दाखविली अनेक तुझी रुपे देवा
आलास कोरोना योद्धे बनुनी,
डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी
प्रशासक, शेतकरी अन् गृहिणी,
एखाद्याच्या चुकीमुळे प्रत्येकजण
कोरोनाच्या विळख्यात अडकतो आहे,
या काळातही प्रत्येक कोरोना योद्धा
जिवाचं रान करुन लढतो आहे,
कोरोनामुळे सगळ्यांच्याच
संसाराची झाली आहे माती,
हातावर ज्यांचे पोट आहे
त्यांच्या आयुष्याची मंदावली गती,
प्रशासन अन् सामान्य नागरिक
एकमेकांस देत आहेत साथ,
कोरोना योद्ध्यांच्या मदतीने
देश कोरोनावर करत आहे मात,
बघ आमच्या वेदनांना देवा
करु नको आम्हाला दुर्लक्षित,
माझ्या कोरोना योद्ध्यांना साथ दे,
बळ दे लढण्यासाठी, ठेव त्यांना सुरक्षित