Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

मोहम्मदअली पठाण

Romance

4.6  

मोहम्मदअली पठाण

Romance

प्रेमा तुझा रंग कसा

प्रेमा तुझा रंग कसा

1 min
206


प्रेमा तुझा रंग कसा

-

जरी सावळी रंगाने, 

भासे मजला तु परी,

सर्व गौण प्रेमापुढे, 

तुच माझ्यासाठी गोरी,  

-

प्रेम आहे मनातुनी, 

नाही हे वरवरचे, 

तुला पाहता खुलती, 

दरवाजे हृदयाचे, 

-

नाही उपमा प्रेमाला,

प्रेम घ्यावे प्रेम द्यावे,

ना कुठला मोबदला,

प्रेम निर्मळ असावे, 

-

तुझा पडलेला पेन,

हीच माझी साठवण, 

तु फेकलेली नजर, 

हीच खरी आठवण,  

-

प्रेम केले तुझ्यावर,

तुझ्या रंगावर नाही, 

प्रेम केले मनावर,

तुझ्या अंगावर नाही,  

-

हवा तुझा सहवास,

अत्तराचा वास जसा, 

प्रश्न पडतो मनाला,

प्रेमा तुझा रंग कसा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance