STORYMIRROR

vaishali vartak

Action Inspirational

4  

vaishali vartak

Action Inspirational

कोणी कोणाचे नाही

कोणी कोणाचे नाही

1 min
241

आलो एकटेच जगी

वाढविले स्वखुषीत

दिले प्रेम पालकांनी

मोठे केले सोबतीत


भोगण्यास नाही कुणी

स्वकर्माचे कर्म फळ

मंत्र ठेवा सदा ध्यानी

हवे मनी आत्म बळ


वाचा पाढे स्वकर्माचे

नको कुकर्म जीवनी

भागीदार होत नाही 

दुःख भोगण्या त्याक्षणी


कर्म सिध्दांत वदले

कृष्ण अर्जुनास रणी

 कुणी नाही कुणासाठी

कर कर्म रणांगणी


आयुष्याच्या सांजवेळी

कुणी नाही कोणासाठी 

आता तरी जगून घे

 काही क्षण स्वतःसाठी



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action