Sushil Deshpande

Inspirational


4.1  

Sushil Deshpande

Inspirational


कोकीळ गान...

कोकीळ गान...

1 min 1.2K 1 min 1.2K

कोकीळ गान...

चाहूल वसंत ऋतूची...

ऋतू पानझडीचा...

नव्या पालवीचा....

रंग उधळण्याचा...

नव्या वर्षांत पाउल ठेवण्याचा...

 

कोकिळेचेच पहा.. दिसतेय पानझड..

पण कूहू कूहू चालूच....

स्विकारले आहे तिने निसर्गाला...

खऱ्या अर्थाने...

पालवी नवी फुटणारच...

या आशेने...

 

निसर्गाशी एकरूप होऊन...

सुमधूर गातच राहून....

आणि मग...

फुटते पालवी.. फुटते पालवी..

गुलमोहर सुद्धा जातात बहरून...

 

काय शिकावे आपण...

या गाण्यातून... बहरण्यातून....

 

विपरीत परिस्थितीत संयम..

जी राहणार नसते कायम...

सकारात्मक राहून पार पाडा..

 निसर्गातली आपली भूमिका...

 

कारण...

 

सर्व काही सुरळीत सुरक्षित...

निसर्गच देणार आपल्या झोळीत..  

 निसर्गच देणार आपल्या झोळीत..


Rate this content
Log in

More marathi poem from Sushil Deshpande

Similar marathi poem from Inspirational