STORYMIRROR

Sushil Deshpande

Others

4  

Sushil Deshpande

Others

निसर्ग होतोय रिबूट

निसर्ग होतोय रिबूट

1 min
242

निसर्ग होतोय रिबूट

होय, निसर्ग होतोय रिबूट..

 

निसर्गाचा हिस्सा असलो तरी

आचरणात आहे का जबाबदारी

लोकसंख्या वाढीसोबतच आता

तंत्रज्ञान घेतेय मर्यादेपार भरारी

 

सदैव हवाय सर्वानाच विकास

ज्यामुळे होतोय निसर्ग भकास

मानवकेंद्रित राहिलीय सर्वच आस

ध्वस्त करण्यास या निसर्गाला खास

 

मानवाचा संबंध मानवापुरताच

निसर्ग उरलाय निसर्गापुरताच

हे असे सगळे कुठवर चालणार

आता तरी हे थांबवावेच लागणार

 

दशकांची देऊन समज आणि वेळ

निसर्ग म्हणतो आता जमवूया मेळ

मानवाला वाटे हा तर उगा वेडा खेळ

कसला हा निसर्ग नि कसला तो मेळ

 

वाट अशी ही पाहून पाहून

निसर्ग गेला पुरता थकून

धडा आता शिकवावाच लागेल

हे मात्र पक्के ध्यानात ठेवून...

 

माणसानेच दिली मग अजाणतेपणी संधी... 

एक सोडून विषाणू जगण्याची केली वांधी..

संपूर्ण मानवजात घरातच झालीय बंदी...

अर्थव्यवस्थेत सुद्धा झोकाळली आहे मंदी..

 

समतोल असमतोलाचा भार

जेव्हा झाला सहनतेच्या पार

निसर्ग दाखवणारच आता...

आपली किमया अपरंपार...

 

शेवटी... शेवटी...

 

निसर्ग म्हणाला स्वतःला

जर रहायचे असेल शाबूत

हीच ती खरी वेळ...

जेव्हा करायला हवे रिबूट

जेव्हा करायला हवे रिबूट...

 

रिबूट करून काय काय हो साधणार

 

सर्वच आता गुण्यागोविंदाने नांदणार

 

मनुष्य प्राणिमात्रा जीव आणि जंतू

वृक्षवल्लीं सकट निसर्गाचे खरे तंतू

 

पृथ्वी जल वायू अग्नी आणि आकाश

मिळवून देतील आपल्या जीवनात हो प्रकाश...

आपल्या जीवनात हो प्रकाश...


Rate this content
Log in