मी बायको आणि लॉकडाऊन
मी बायको आणि लॉकडाऊन


नववर्षापासून शोधणार होतो एक तंत्र
बायकोला खुश ठेवायला झकास मूलमंत्र..
विचार करायचा होता काहीतरी मस्त
पण लॉकडाऊनमुळे झालो ना बंदिस्त..
आलीया भोगासी असावे आपण सादर..
बायको सोबत रहायला दिवसभर तयार...
यापुढची गंमत घरातच होणार
बायकोचे आता ऐकावे लागणार..
तिने म्हटले घरचे करा थोडे काम
फुटला की हो मला उगाचच घाम
आता कशी देणार ऑफिसची कारणं
एकावर एक या अशा थापा मारणं
वर्क फ्रॉम होममुळे मात्र आता
झाली पंचाईत काही दिवसांकरता
सगळेच घडतेय डोळ्यापुढे तिच्या
थापा मारायच्या झाल्यात गोच्या
तिला पण समजू लागलेय माझे आता काम
मलाच सांगू लागली पद्धती भलत्याच ठाम
पकडला मी जातोय असा आजकाल
वीस दिवस तरी असेच व्हायचे हाल.. 
;
त्यातच बंद झाल्या आहेत बैठका मित्रांसोबत..
कारण शोधून काढायची ती सारी खलबतं..
मित्र सुद्धा सगळेच झाले आता हतबल..
सार्यांच्याच बायकांचे वाढले आहे मनोबल...
शेवटी उरला नाही मार्ग तह करण्यावाचून..
ऑफिस कामासोबत घरची जबाबदारी वेचून...
म्हणे सुज्ञास अधिक सांगणे नलगे हे तंत्र...
उशिरा का होईना, उमगला मला मूलमंत्र...
घर स्वच्छ ठेवायला करतोय झाडू पोछा..
जळमट काढायला तर नाकावर गमछा..
भांडी अक्षय पात्रामधली घासूनपुसून ठेवतोय..
वाळत कपडे घालून त्यांच्या घड्याही रचतोय...
अशाप्रकारे सजला राजा राणीचा संसार...
राणीच्या बरोबरीने राजा लावतो हातभार..
सुंदरसे हे घरकुल झाले आनंदाने परिपूर्ण...
साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण..